Ticker

6/recent/ticker-posts

स्वरसाधना संगीत विद्यालयाचा १००% निकाल



साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी 

मेहकर : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई द्वारा संचलित स्वरसाधना संगीत विद्यालय,मेहकर यांनी विविध संगीत परीक्षांमध्ये १००% यश प्राप्त केले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये प्रारंभिक - कु. प्रेरणा सावळे गायन प्रथम श्रेणी, कु. शरयू शिंदे गायन प्रथम श्रेणी, कु.आरुषी सोनुने हार्मोनियम वादन प्रथम श्रेणी, कृष्णा सोनुने हार्मोनियम वादन द्वितीय श्रेणी प्रवेशिका प्रथम - निरंजन गायकवाड गायन, द्वितीय श्रेणी प्रवेशिका पूर्ण - प्रा.साहेबराव अंभोरे हार्मोनियम वादन प्रथम श्रेणी, प्रा.समाधान गिरी गायन प्रथम, समाधान इंगळे गायन तृतीय अशाप्रकारे यश प्राप्त केले आहे.

      निकालाबाबत मनोगत व्यक्त करतांना आनंदाने विद्यार्थी म्हणाले की, गुरुवर्य प्रा.गायकवाड सर हे उच्चशिक्षित असून त्यांनी संगीतामध्ये नेट सेट संगीत विशारद ही पदवी प्राप्त केलेली असून त्यांचा संगीत विषयाचा सखोल, गाढा अभ्यास आहे, सरांची शिकविण्याची पद्धत अत्यंत चांगली असून परिपूर्ण ज्ञान, भरपूर सराव घेतात. सर्व समस्या, संकल्पना स्पष्ट करून सांगतात. जगदंबा फ्लोअर मिल, शिवाजी नगर येथे संगीत विद्यालय असून नियमित क्लास घेतले जातात.

        स्वरसाधनाचे संचालक तथा संगीत शिक्षक प्रा. सुरेश गायकवाड सर यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ते म्हणाले की संगीत हा जीवनाचा पाया असून आजच्या धकाधकीच्या, संघर्षमय जीवनात संगीत मनाचा उपचार करते. आनंदी जीवनासाठी,मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत अत्यंत आवश्यक आहे.