महाराष्ट्र ग्रामीण न्युज सोनपेठ / प्रतिनिधी शिवशंकर तुपकर
आमदार राजेश विटेकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने वर्ष २०२४ चा ३७ कोटी ४५ लक्ष ७५ हजार रुपये पीकविमा अखेर मंजूर झाला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात . आमदार विटेकर यांनी ४ जून २०२४ पासून कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश आले. परभणी जिल्ह्यातील ५ महसूल मंडळातील गावातील ३६ हजार ७२६ शेतकऱ्यांना जवळपास ३७ कोटी ४५ लाख रुपये पीकविमा मिळणार आहे. २०२४/२५मध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मदत दिलेली नव्हती. आमदार विटेकर यांच्या पाठपुराव्यानंतर कृषी मंत्र्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला यासंबंधी सक्त सुचना देऊन फटकारले होते. मंजूरीबाबत शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, सोनपेठ, आवलगाव, शेळगाव, वडगाव, दुधगाव या महसूल मंडळातील गावांमधील ३६ हजार ७२६ शेतकऱ्यांना सरासरी १० ते २० हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
खरीप पेरणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.





Social Plugin