Ticker

6/recent/ticker-posts

पालघर जिल्ह्याचे भूषण, ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात



  प्रतिनिधी  सौरभ आहेर 

 मोखाडा पालघर जिल्ह्याचे भूषण, ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्यांनी आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक तारपा वादनाची ४०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा जपत आयुष्यभर या कलेची सेवा केली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे पालघर जिल्हा, आदिवासी समाज आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा गौरव वाढला आहे.

भिकल्या धिंडा यांचे हे यश असंख्य लोककलावंतांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याला आणि समर्पणाला मनःपूर्वक सलाम! 

दिलीप मोहंडकर  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख यांनी व्यक्त केले आहे की ही फक्त आदिवासी समाजा साठी नाही तर पूर्ण पालघर जिल्हा आणि महाराष्ट्र चा अभिमानाची गोष्ट आहे.