बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व नवगतांचे स्वागत मोठ्या उत्साहामध्ये विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपसरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय राजेघाटगे , सदस्य चंद्रकांत चव्हाण, दयानंद जगदाळे, सागर देसाई व माता पालक संघाच्या सदस्य अंजुम मोमीन, अरुणा बोराटे, श्रद्धा पवार , ज्योती जगदाळे, अर्चना जगदाळे, ज्योती दळवी , सारिका सुर्यवंशी , सीमा जंगम , रूपाली बोराटे यांचे स्वागत प्राचार्य अंकुश भांगरे , नाना दडस, तानाजी पाटील, संजय माने व चंदा वाईकर व आश्विनी माने यानी केले .सर्व नवगतांचे ढोल ताशा, झांज वाद्यवृद्धांच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले . यावेळी उपस्थितमान्यवरांच्या हस्ते पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या , चॉकलेट व खुदाबक्ष पिरजादे यांच्या वतीने पेन देण्यात आला . तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी शंभूराज घाटगे इंडियन एअर फोर्स, मुंबई पोलीस मध्ये अर्जुन खवळे ,शाहिद मोमीन ,कोमल खरात तसेच संकेत ढवळे, विशाल पवार ,हर्षद काटकर, रणजीत कदम यांची आर्मीमध्ये निवड झाली तसेच प्रसाद बोराटे पोलीस उपनिरीक्षक निवड झाली याबबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांनी शैक्षणिक वर्ष 2026 -27 या मध्ये राबविण्यात ।येणाऱ्या उपक्रमा संदर्भात माहिती दिली . तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील तसे सांगितले तसेच विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यातून 1993 -94 ची बॅच ने फरशी बसून दिल्याने व 1991 -92 च्या बॅचच्या वतीन विद्यालयास रंगरंगोटी व मैदानाचे काम भौतिक सुविधा दिल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी व्यक्त केले .यावेळी मा . अभय राजे घाटगे यांनी विद्यालयाच्या विकासासाठी सर्वतोपरी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल व विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन दिले त्याचबरोबर आर्मी मध्ये व पोलीस भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थी यांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले निवड झालेल्या विद्यार्थी यांची प्ररेणा मुल्नांनी घ्यावी असे आव्हान केले .यावेळी वरिष्ठ लेखनिक हरिश्चंद्र कार्लेकर सर यांचे स्वागत अभय राजे घाटगे यांनी केले तसेच अश्विनी माने सहशिक्षका यांचे स्वागत अंजुम मोमीन यांनी केले .विद्यालयातील सहकारी बोराटे गोविंद दादा यांचा वाढदिवस शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत चव्हाण सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यांनी केले तर आभार संजय माने यांनी मानले व मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी विद्यालयातील ,विद्यार्थी ,प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .





Social Plugin