Ticker

6/recent/ticker-posts

मारुती वाघ यांच्या ‘कर्मचक्र’ कादंबरीस राज्यस्तरीय उदय परिमल पुरस्कार जाहीर



बुध दि [प्रकाश राजेघाटगे ] 

साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय उदय परिमल पुरस्कार यावर्षी लेखक मारुती वाघ यांच्या ‘कर्मचक्र’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार परिमल साहित्य व्यासपीठ, पंढरपूर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.

‘कर्मचक्र’ या कादंबरीत सामाजिक वास्तव, मानवी जीवनातील संघर्ष, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि जीवनचक्रातील विविध पैलूंचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. या साहित्यकृतीच्या आशयगर्भ मांडणीमुळे आणि वाचकांवर उमटलेल्या प्रभावामुळे परीक्षकांनी या कादंबरीची पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मारुती वाघ हे साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून ‘कर्मचक्र’ या कादंबरीला मागील वर्षी राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्याकडून अनुदान प्राप्त झाले होते. या राज्यस्तरीय सन्मानामुळे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, सचिव .विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट) प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे यांनी डॉ. मारुती वाघ यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

याचप्रमाणे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, प्रा. प्रदीप गायकवाड, विनायक वाघ तसेच सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक, यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन  केले आहे. पुरस्कार  13 जून, 2026 रोजी वितरित केला जाणार असल्याचे परिमल साहित्य व्यासपीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या पुरस्कारामुळे लेखक मारुती वाघ यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव झाल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.