Ticker

6/recent/ticker-posts

ई 20 पेट्रोलच्या सक्तीविरोधात आपचे अनोखे आंदोलन... गाडीची अंत्ययात्रा काढत दर्शवला विरोध !


 ई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात आम आदमी पार्टीने अनोखे आंदोलन करत गाडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. बसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ई20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असून इंजिनचे नुकसान आणि दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याचा आरोप करत, प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल (E0/E10) उपलब्ध करून देण्याची, ग्राहकांना इंधन निवडीचे स्वातंत्र्य देण्याची तसेच जुन्या वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले