.jpeg)
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आषाढी एकादशीच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी पंढरपुरात एकवटणार आहेत. वाखरी ते विठ्ठल मंदिर अशी 'सद्बुद्धी दिंडी' काढून मुख्यमंत्री आणि सरकारला सद्बुद्धी मिळावी तसेच शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्याची घोषणा करावी, अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली जाणार आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे




Social Plugin