Ticker

6/recent/ticker-posts

विजयदुर्ग पोलीस ठाणे यांच्या निमित्ताने सशक्त गाव अभियान 2026 चा कार्यक्रम आयोजित

 


 देवगड ग्रामीण प्रतिनिधी अमोल शिर्के महाराष्ट्र ग्रामीण न्यूज 

विजयदुर्ग पोलीस ठाणे यांच्या निमित्ताने गिर्ये येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये सशक्त गाव अभियान हा कार्यक्रम राखण्यात आला. या कार्यक्रमाला  लेफ्टनंट कमांडर देवदत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामस्थ, कोळी बांधव मच्छीमारी संघटना, पोलीस पाटील, महिला बचत गट संघटना सागर रक्षक दल सदस्य, होमगार्ड, रक्षक दल, मत्स्य विभाग, महाराष्ट्र पोलीस, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक, ओएनजीसी अधिकारी मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. विशेष या कार्यक्रमाला उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक श्री दशरथ चव्हाण यांची फार महत्त्वाची अशी होती त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून ग्रामस्थांना आपल्या ग्रामीण विभागाची सुरक्षिता व सागरी सुरक्षिता कशी व्यवस्थित राहील याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कोस्टल विभाग चे अधिकारी कॉन्स्टेबल श्री जयेश कदम, श्री दिवटे साहेब , श्री प्रशांत गावडे, त्यांची उपस्थिती तेथे होती. त्याचप्रमाणे सागर रक्षक दल सदस्य अमोल चंद्रकांत शिर्के, उमेश भगवान शिर्के, मनोहर मुळम, मनोज मुळम, व पोलीस पाटील कलंबई गावचे   रितेश पुजारे या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. त्याचप्रमाणे प्रत्येक गावचे पोलीस पाटील महिला बचत गट, व स्थानिक सामाजिक सेविका महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता. अनेक ग्रामस्थानांनी ग्रामीण सुरक्षिता व सागरी सुरक्षिता याचे प्रश्न लेफ्टनंट श्री कमांडर देवदत्त शर्मा यांना मांडले तेव्हा लेफ्टनंट कमांडर श्री देवदत्त शर्मा यांनी सुद्धा स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्नाचे निरनसन केले. तेव्हा लेफ्टनंट कमांडर  श्री देवदत्त शर्मा यांच्यासोबत मिलिंद तांडेल पोलीस उपनिरीक्षक, श्री विलास बनसोडे नेव्ही अधिकारी, मनोज कुमार सिंह व्ही आय पी एस आय ऑफिसर, फिशरिश डिपार्टमेंटचे अधिकारी, श्री नारकर साहेब, ओएनजीसी अधिकारी, भारतीय नौदल व भारतीय तटरक्षक  यांचे अधिकारी,मत्स्य विभाग, महाराष्ट्र पोलीस, चीफ ऑफिसर नहाले साहेब व कोस्टलचे अधिकारी हे या कार्यक्रमाला उपस्थितीत होते त्यांनी सुद्धा ग्रामस्थांना सागरी सुरक्षा  विषयी  संदर्भात माहिती देण्यात व योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी अधिकारी विजयदुर्ग पोलीस ठाणे  श्री संजय कातिवले  साहेब यांनी केलेले होते. पोलीस उपनिरीक्षक श्री मिलिंद तांडेल यांनी ग्रामस्थांना सागर सुरक्षते विषयी योग्य ते मार्गदर्शन केले. सर्व विजयदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामस्थ व अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गावातील सागर रक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन दल, मच्छीमार बांधव, समुद्रकिनारी व खाडी किनारी राहणारे बांधव, तसेच भारतीय नौदल सेनेचे व तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्र पोलीस येथे उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून मच्छीमार बांधवांचे व स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्नांचे योग्य ते मार्गदर्शन करून कार्यक्रमाचा चहा पाणी बिस्कीट देऊन समारोप घेतला. हा कार्यक्रम राखण्याचा उद्देश एवढाच की ग्रामीण विभागात सागरी सुरक्षता व ग्रामीण सुरक्षितता त्याच्या बाबतीत जनजागृती समाजामध्ये निर्माण करणे हा आहे .