बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
कुमठे फाटा येथून गुरू हैबतरावबाबा भजनी मंडळ दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले . शुभारंभ प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सौ. प्रियाताई महेश शिंदे यांनी स्वतः डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. तर भर पावसात उपस्थित वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचा गजर केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हणमंत जगदाळे (पाटील), भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, निवृत्त न्यायाधीश बाळासाहेब काळे, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, पोलीस पाटील जयवंत जगदाळे (पाटील) देवकर आण्णा , ह. भ. प. रघुनाथ फडतरे, नामदेव राऊत, तानाजी फडतरे , अनिल फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना, डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, हैबतराव बाबा दिंडी सोहळा व शिंदे कुटुंबीयांचे अनेक वर्षाचे जीवाभावाचे नाते आहे. हे नाते कायमस्वरुपी टिकवले जाईल. यावेळी त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांना सुखरूप वारी होण्यासही मनोभावी शुभेच्छा दिल्या. दिंडी चालक निलेश उर्फ माऊली महाराज, अतूल सुतार, अमर सुतार यांनी स्वागत केले.
मार्गदर्शक धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते
राजाभाऊ जगदाळे, अनिल चव्हाण, रायबा शिंदे सरकार,विकास केंजले, शरद कदम,सूरज भांडवलकर,लक्ष्मण केंजळे, भिमराव केंजळे, लक्ष्मण गोगावले,कुलदीप जगदाळे, विक्रम शिंदे,रामदास शिंदे , संतोष गोरे,संदीप चव्हाण,पोपट सुतार, चंद्रकांत वीरकर, लक्ष्मण गवळी, हणमंत सुतार, शामगावकर ताई, विद्या जगदाळे, सारिका क्षीरसागर, राजश्री सुतार, शितल सुतार, जयश्री सुतार आदींसह वारकरी, भाविक उपस्थित होते.





Social Plugin