Ticker

6/recent/ticker-posts

मेळघाटातील आदिवासी आश्रम शाळा टिटम्बा येथे घडली घटना,,,80 विद्यार्थ्यांना विषबाधा,,

 


आरिफ खान पठाण  प्रतिनिधी, महाराष्ट्र ग्रामीण न्युज मेळघाट

अमरावती , धारणी मेळघाटातील आदिवासी भागात टिटम्बा या गावातील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना जेवण केल्या नंतर सुमारे ७०ते ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असता पूर्ण शाळेत घबराहाट पसरली,विद्यार्थ्यांना तत्काळ उपचार करण्यासाठी धारणी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या वर उपचार सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना संडास,उलट्या,पोटदुखी आणि चक्कर येऊ लागली अचानक झालेल्या बिघाडा मुळे शाळा प्रशासन आरोग्य विभाग मध्य घबराहाट पसरली,लगेच आरोग्य विभाचे पथक घटनास्थळी पोहोचले सर्व बाधित विद्यार्थ्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले,या घटने मुळे विद्यार्थी आणि पालका मध्ये धास्ती भरली असे होत असल्यास आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षे वर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे,तरी स्थानिक लोकांनी तसेच पालकांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मांग केली आहे,तरी शासनाने या घाटणेवर उचित पाऊल उचलून अशी घटना डबल घडू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे