Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूरात टाळ-मृदगांच्या गजरात आषाढी दिंडी



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथे आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी शनिवार दि.२५ जुलै रोजी सायंकाळी आदमपूर परिसरातील वारकरी भक्तांनी टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढलेली होती.भजन,कीर्तन करीत ही दिंडी विठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून गावा भोवताली प्रदक्षिणा घालीत मार्गस्थ झाली होती.गावात वैष्णव भक्त वारकरी संप्रदायाचीपरंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे जपली जात असून यंदाही आषाढी एकादशी पर्वानिमित्त दिंडी सोहळ्याचेआयोजन अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य,संस्कार आणि भक्तिचा वारसा जपणारी आहे.'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजरात परिसरात भक्तिरसाचे चैतन्य निर्माण झाले होते.प्रतिवर्षी गावातील काही विठ्ठल 

भक्त पायी वारीसाठीही जात  असतात.सदरील दिंडीत लहान मुले, वारकरी अबाल,वृध्द, महिला व पुरुषांचा सहभाग उल्लेखनीय होता.एकादशी निमित्त वैष्णव भक्तांनी दिवसभर उपवास ठेवला आणि सायंकाळी चेअरमन चंद्रकांत पाटील आणि योगेश पाटील यांच्या माडीवजा ओसरीत राञभर भजन,कीर्तन वारकऱ्यांनी संपन्न केल्यानंतर, दुसर्‍या दिवशी रविवार दि.२६ जुलै रोजी उपवास ठेवलेल्या भाविक भक्तांसाठी प्रतिवर्षी प्रमाणे जेवणाचे माडीवर आयोजन पाटील परिवाराकडून करण्यात आले होते.