Ticker

6/recent/ticker-posts

मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात

 


पत्रकार सचिन काळखैरे ग्रामीण प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील सुपे येथील अहिल्याबाई चौकात मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू , तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २६) दुपारी सुमारे २ वाजता घडली

मिळालेल्या माहितीनुसार, सुपे येथील दोन्ही सख्खे भाऊ दुचाकी (क्र. एमएच ४२ ई १८७८) वरून घराकडे जात होते. अहिल्याबाई चौकातून पुढे वळण घेत असताना त्यांची दुचाकी घसरली त्याच वेळी समोरच्या दिशेने येत असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रक (क्र. एमएच १० सीआर ४१९९) च्या चाकाखाली दुचाकी गेल्याने भीषण अपघात झाला. अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम ठोंबरे गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस घटनास्थळी दाखल होवुन झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. अपघाताचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.