Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार संरक्षण समितीची नाशिक जिल्हा व तालुका बैठक ,पहिने ता.त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात संपन्न झाली,





प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर घोटी.बु,       

  पत्रकार संरक्षण समितीची नाशिक जिल्हा व तालुका बैठक पहिने (ता. त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी घोटी रोड) येथे अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीत येत्या सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यात होणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे भव्य नियोजन करण्यात आले.ही बैठक पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राम खुर्दळ, व जिल्हाध्यक्ष मा.श्री.देवचंद महाले,

यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.विविध समित्यांवर सोपवली जबाबदारीसप्टेंबरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी बैठकीत विविध समित्यांचे गठन करून पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने पुढील नियोजनाचा समावेश आहे:पाच मानाचे पुरस्कार: संमेलनात पत्रकारिता, समृद्ध गाव, पर्यावरण मित्र, महिला समलीकरण आणि लोककला, या ५ विविध विषयांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातील. पुरस्कारार्थींना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि 'ग्रामगीता' देऊन गौरविण्यात येणार आहे.विशेष परिसंवाद: ग्रामीण पत्रकारांच्या उपेक्षित जीवनावर आधारित एका विशेष परिसंवादाचे आणि ठरावांचे आयोजन करण्यात येणार आहे.दोन सत्रात आयोजन: हे संमेलन दोन सत्रांमध्ये होणार असून, यासाठी वक्ते व मार्गदर्शकांची यादी अंतिम करण्यात आली आहे. तसेच संमेलनाचा प्रचार-प्रसार, हॉल, मुक्काम, आणि भोजन-नाश्ता यांचेही चोख नियोजन करण्यात आले आहे.विशेष स्मरणीका: ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत मुद्द्यांना वाचा फोडणारी एक विशेष 'स्मरणीका' या संमेलनात प्रकाशित केली जाणार आहे.नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदानयाच बैठकीत निफाड तालुकाध्यक्षपदी प्रदीप कापसे, आणि तालुका सचिवपदी वाल्मिक ठोंबरे, यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष देवचंद महाले, यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.पदाधिकाऱ्यांची उपस्थितीया बैठकीला जिल्हाध्यक्ष देवचंद महाले, राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ, विभागीय प्रमुख माया मुक्ताई, शहर प्रमुख राजू भांड, त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख पांडुरंग मोंढे, इगतपुरी प्रमुख सुनील पगारे, सचिव शिवनाथ घोटकर, निफाड अध्यक्ष प्रदीप कापसे, आणि सचिव वाल्मिक ठोंबरे, आदी पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.