जिल्हास्तरावर गुंजन सुलताने तर तालुकास्तरावर खुशी अंबरतेची उल्लेखनीय कामगिरी !
प्रतिनिधी :- राजेश दामोदर हाता :
दि . ५ जुलै २६ जि.प. प्राथमिक वरिष्ठ शाळा, हाता येथील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
या परीक्षेत विद्यार्थिनी गुंजन श्रीकृष्ण सुलताने हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले, तर विद्यार्थिनी खुशी अजय अंबरते हिने तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत यश संपादन करून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
या यशामागे विद्यार्थिनींची जिद्द, नियमित अभ्यास, पालकांचे सहकार्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छाया धूर्वे मॅडम यांचे सक्षम नेतृत्व आणि मार्गदर्शक वर्गशिक्षिका कोंडोलीकर मॅडम तसेच इतर शिक्षकवृंद यांचे सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे जि.प. प्राथमिक वरिष्ठ शाळा, हाता ही ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Social Plugin