ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा,नांदेडचे जिल्हाध्यक्ष उत्तम पुणाजी चव्हाण यांनी शिवसाई सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील शिवलिंगराव इरन्ना इबिते यांची भाजप ओबीसी मोर्चा,नांदेडच्या जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती केली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र दि.६ जुलै २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.शिवलिंग इबिते यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत, तसेच पक्षाप्रती असलेली निष्ठा,संघटन कौशल्य आणि सक्रिय कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीप्रसंगी जिल्हाध्यक्ष उत्तम पुणाजी चव्हाण यांनी पक्षाची ध्येय धोरणे,केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.यावेळी शिवलिंगराव इरन्ना इबिते यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या आपल्यावरील विश्वासाबद्दल आभार व्यक्त करीत,पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपण कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.या नियुक्तीबद्दल भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून शिवलिंग इरन्ना इबिते यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





Social Plugin