Ticker

6/recent/ticker-posts

स्व.हुकमचंदजी कोटेचा सहकार विद्यामंदिर दे मही शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दिवस मोठया उत्सवात साजरा



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे मही शाळा आज दि 30/06/2026 पासून पूर्वपदावर मोठ्या उत्सवात सुरू झाली..सर्वप्रथम बाल चिमुकल्यांचे लेझीम व ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले..सदर कार्यक्रमाला डॉ सौ गोडे मॅडम,डॉ शिल्पा दंदाले मॅडम,डॉ महेश दंदाले,संतोष जाधव,दीपक शिंगणे,कैलास शिंगणे ,दीपाली शिंगणे,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे,पर्यवेक्षक श्री खेडेकर सर चव्हाण सर,रोहित सर सह विविध मान्यवरांची उपस्थिती होती..

शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेली ..अत्यंत आंनदायी व उत्साहपूर्ण वातावरणात नवीन बालकांचे स्वागत करून त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले..विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून शाळेत उत्साही वातावरण तयार झाले ..सदर कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिकतेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले..तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळेकर यांनी केले...