प्रतिनिधी : जव्हार / विजय अधिकार
लायन्स क्लब ऑफ मिलेनियम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बरवाडपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितल
शाळेच्या मुख्याध्यापकांनी तसेच शिक्षकांनी लायन्स क्लब ऑफ मिलेनियम चॅरिटेबल ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ मिलेनियम चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin