Ticker

6/recent/ticker-posts

*गोरंबा–लेगापाणी रस्त्याची दुरवस्था; प्रशासनाने दखल घेण्याची नागरिकांची मागणी*

 



( ,ग्रामीण प्रतिनिधी, देवचंद पाडवी*) :   

धडगाव तालुक्यातील गोरंबा ते लेगापाणी हा  रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकी, चारचाकी तसेच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे या रस्त्यावरील परिस्थिती आणखी गंभीर बनत असून अपघाताची भीतीही वाढली आहे.विशेष म्हणजे हा रस्ता शहादा, राणीपुर, म्हसंवाद, तोरणमाळ या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. तसेच धडगावहून तोरणमाळकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही हा महत्त्वाचा संपर्क मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून होत असते. गोरंबा, निगदी, मोडलगाव, तेलखेडी व परिसरातील नागरिक शिक्षण, आरोग्य, शेतीमालाची वाहतूक आणि दैनंदिन कामांसाठी याच मार्गाचा वापर करतात.  त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या रस्त्याची  पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे, अशी  मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यात या मार्गाचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.