इगतपुरी तालुक्यातील वासाळे फाटा ते टाकेद हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गालगत बारशिंगवे, सोनोशी, बांबळेवाडी, टाकेद आदी गावे असून हजारो ग्रामस्थ या रस्त्याचा दररोज वापर करतात. तसेच हा महत्त्वाचा मार्ग भंडारदरा ते नाशिक यांना जोडणारा असल्याने पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यटकांचे मोठे हाल होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.





Social Plugin