इगतपुरी तालुक्यात पावसाने दीर्घकाळ उघाड दिल्यामुळे भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाण्याअभावी अनेक शेतांतील भाताची रोपे पिवळी पडू लागली असून वाढ खुंटली आहे. वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक शेतकरी चिंतेत असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





Social Plugin