Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर शहरात महिला सफाई कर्मचाऱ्यास अज्ञात व्यक्तीकडून मारहाण; कामगारांत संताप



प्रतिनिधी | एस. सावंत 

अर्धापूर शहरात कर्तव्यावर असलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सफाई कामगारांनी एकत्र येत पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत कार्यरत असलेली महिला सफाई कर्मचारी शहरात रोजच्या प्रमाणे सफाईचे काम करत होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने कारण नसताना तिच्याशी हुज्जत घालून मारहाण केली. या घटनेमुळे महिला कर्मचारी प्रचंड घाबरली असून तिला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर अर्धापूरमधील सर्व महिला व पुरुष सफाई कामगारांनी एकत्र येत अर्धापूर पोलीस ठाण्यासमोर त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला. कामावर असताना महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे, आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेतली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

सफाई कामगार संघटनेने नगरपंचायत प्रशासनाकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.