मारोती गाडगे/प्रतिनिधी
गेवराई () : - गेवराई शहरातील शारदा हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. एका गर्भवती महिलेची एकाच वेळी तीन बाळांची (ट्रिप्लेट्स) नॉर्मल डिलिव्हरी यशस्वीपणे पार पाडण्यात आली असून, आई आणि तिन्ही नवजात बाळे पूर्णपणे सुखरूप आहेत. येवढेच नाही तर सौ.लक्ष्मी अंकुश राऊत गोंदी येथील रहिवाशी असणारे यांना पाच ते सहा महिन्यांपूर्वी दोन जुळे मुलगा आणि मुलगी झाली. डॉ प्रदिप राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार , बीड जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी तीन बाळांची नॉर्मल डिलिव्हरी यशस्वी झाल्याची अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे. या महिलेची गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच शारदा हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी आणि उपचार सुरू होते. गर्भधारणेची गुंतागुंत लक्षात घेता तिला मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याचा सल्ला मिळण्याची शक्यता होती.
परंतु, शारदा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ *डॉ. प्रदीप राठोड* यांनी आत्मविश्वासाने संपूर्ण उपचाराची जबाबदारी स्वीकारली आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उपचार करत आई व तिन्ही बाळांना सुरक्षित ठेवत यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी घडवून आणली.
डॉ. प्रदीप राठोड यांच्या कुशल हातांनी आईसह तिन्ही चिमुकल्यांना दिले सुरक्षित जीवन!*
महोत्सवाचे म्हणजे संबंधित महिला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. मोठ्या शहरात उपचारासाठी जाणे तिच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या कठीण ठरले असते. अशा परिस्थितीत शारदा हॉस्पिटलमध्येच उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*डॉ. प्रदीप राठोड* हे महिलांच्या आरोग्यसेवेसाठी समर्पित वैद्यकीय तज्ञ म्हणून ओळखले जातात. अत्याधुनिक उपचारपद्धती, अचूक निदान, रुग्णांप्रती आत्मीयता आणि कठीण प्रसूती यशस्वीपणे हाताळण्यातील अनुभवामुळे त्यांनी अनेक महिलांचा विश्वास संपादन केला आहे.
या यशस्वी ट्रिप्लेट नॉर्मल डिलिव्हरीमुळे त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना महानगरांमध्ये धाव घ्यावी लागते, अशी सर्वसाधारण धारणा असताना गेवराईसारख्या शहरातील शारदा हॉस्पिटलने ही उल्लेखनीय कामगिरी करून ग्रामीण भागातही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याचे सिद्ध केले आहे.
या यशामुळे शारदा हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे कौतुक होत असून, आई आणि तिन्ही बाळांच्या उत्तम प्रकृतीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेवराईसह संपूर्ण बीड जिल्ह्यात या यशस्वी वैद्यकीय पराक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
*महिलांसाठी विश्वासाचे नाव: डॉ. प्रदीप राठोड*
गेवराई शहरातील शारदा हॉस्पिटलचे स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ. प्रदीप राठोड यांनी आपल्या कौशल्यपूर्ण उपचारामुळे अनेक महिलांचा विश्वास संपादन केला आहे. गुंतागुंतीच्या प्रसूती यशस्वीपणे हाताळण्याचा अनुभव, रुग्णांप्रती आत्मीयता आणि वेळेवर येण्याची उपचर ही त्यांची ओळख बनली आहे.
अलीकडेच एका गर्भवती महिलेची एकाच वेळी तीन बाळांची (ट्रिप्लेट्स) यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी करून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वैद्यकीय कौशल्याची छाप उमटवली. या यशस्वी उपचारामुळे आई आणि तिन्ही नवजात बाळे सुखरूप असून, परिसरातून डॉ. राठोड व शारदा हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक होत आहे.
*रुग्णसेवेपलीकडे माणुसकीचा स्पर्श; डॉ. प्रदीप राठोड यांच्याकडून मातेचा सन्मान*
शारदा हॉस्पिटलमध्ये ट्रिप्लेट्सची यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रदीप राठोड यांनी संबंधित मातेचा साडी-चोळी व संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन सन्मान केला. आई व तिन्ही नवजात बाळांच्या उत्तम प्रकृतीबद्दल शुभेच्छा देत त्यांनी कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वैद्यकीय उपचारा सोबतच सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांचा सन्मान करण्याची ही कृती उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.





Social Plugin