Ticker

6/recent/ticker-posts

श्री हनुमानगिरी हायस्कूलचे इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदिपक यश

 

 



 

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या आदर्श संस्थेच्या श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथील विद्यार्थ्यांनी  इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मोठे यश संपादन केले. इयत्ता पाचवीचे दोन इयत्ता आठवीचे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून 

  विद्यालयाची शिष्यवृत्ती

 परीक्षेतील यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी -

1 . आर्यन गणपती पवार

2 . सई विक्रम चव्हाण

इयत्ता आठवीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

    1 . प्रभात पवन गायकवाड

2.  अन्विका सागर जाधव

3 . रुचिता राजकुमार नौगण

4 . हितांशा संजय माने 

श्री हनुमानगिरी हायस्कूल "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त असून या शाळेत नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. तंत्र शिक्षणाची सोय असलेली ही तालुक्यातील एकमेव विद्यालय असून येथे विद्यार्थी सर्वांगीण विकास व सर्व गुण संपन्न  घडवले जातात.

 या यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव,खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,सर्व संस्था संचालक तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी के. डी.पवार सर, श्री. डी.पी. शिंदे सर,श्री एस. आर. पाटील सर, तसेच श्री जयंतराव जाधव मुख्याध्यापक श्री डी.एन. गोफणे , . पर्यवेक्षक सौ  एस्. जे. लाड, प्रा. जे. बी.जाधव,पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.