बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील प.पू. श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये अखंडपणे सुरू असणाऱ्या महाप्रसादाच्या सेवेसाठी एक मोलाचे योगदान लाभले आहे. कै. एकनाथराव शंकरराव जाधव (जामदार) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या सुकन्या जयश्री अंकुशराव शिंदे (रा. अंभेरी, ता. खटाव, जि. सातारा माहेरवाशिणी) मंदिरातील कायमस्वरूपी पुसेगावच्या यांच्याकडून अन्नदान सेवेकरिता दोन लाख रुपयेचा निधी देवस्थानला अर्पण करण्यात आला आहे.
हा निधी मान्यवरांच्या आणि देवस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तीमय वातावरणात सुपूर्त करण्यात आला. या मंगलप्रसंगी जयश्री अंकुशराव शिंदे यांचा देवस्थानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प.पू. मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, श्रीसेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव आणि संतोष (बाळासाहेब) जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कै. एकनाथराव जाधव यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ त्यांच्या कन्येने सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत दिलेले हे योगदान अत्यंत कौतुकास्पद असून, पुसेगाव परिसरासह खटाव तालुक्यातून या दातृत्वाचे मनापासून कौतुक होत आहे.





Social Plugin