तालुका प्रतिनिधी
मारोती गाडगे /गेवराई
गेवराई : (बीड) :-
गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगडाचे सेवेकरी संत नगद नारायण महाराजांचे निस्सीम भक्त
सुशी येथील रहिवासी असलेले एकनाथ शामराव पौळ यांचे गुरुवार दि.१६ जुलै रोजी सायं ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय १०५ वर्षे होते. तर गडाचे सेवेकरी असल्याने ते जिल्ह्यात सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेवराई तालुक्यातील सुशी येथील रहिवासी एकनाथ शामराव पौळ हे श्रीक्षेत्र नारायणगडावर गेल्या अनेक वर्षांपासून गडाची सेवा करत होते. यामुळे ते जिल्ह्यात सर्वत्र सुपरिचित होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचारादरम्यान गुरुवार दि.१६ जुलै रोजी सायं ५.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या पश्चात मुले , सुना, नातवंडे, पत्रुंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर शुक्रवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सुशी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पौळ परिवाराच्या दुःखात दैनिक..... परिवार सहभागी आहे.





Social Plugin