Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे वाटूर येथे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण



प्रतिनिधी : कैलास कोल्हे

वाटूर, दि. २६ जुलै २०२६ : लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आनंदो प्रकल्प अंतर्गत वाटूर सेंटरच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी शंभू महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाटूर येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत ११३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जालना विभागाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री. जोमा मस्ती सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. जोमा मस्ती सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मंठा येथे कार्यरत असलेले आरोग्य सेवक श्री. शरद खाडे सर उपस्थित होते.

यावेळी शंभू महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राऊत सर, सहशिक्षक डॉ. के. बी. जाधव सर तसेच श्री. निलेश चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी ईश्वरी लक्ष्मण काकडे हिने प्रभावीपणे केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला वही, आलेख पुस्तक तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट सातत्याने कार्यरत असून, शिक्षणासाठी आवश्यक साधने, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना देण्याचे कार्य संस्था करत आहे.

कार्यक्रमास लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे बदनापूर सेंटरचे सेंटर एक्झिक्युटिव्ह श्री. कैलास कोल्हे सर, मंठा सेंटरचे सेंटर एक्झिक्युटिव्ह श्री. आकाश राठोड सर, वाटूर सेंटरचे सेंटर एक्झिक्युटिव्ह श्री. अमोल गोंडगे, तसेच SFSEP प्रकल्पाचे शिक्षक श्री. प्रल्हाद खरात सर आणि श्री. जनार्दन राठोड सर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.