बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गुरसाळे या विद्यालयाची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. आराध्या विजय जाधव हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (Scholarship Exam) उत्कृष्ट कामगिरी करत सातारा जिल्ह्यात ११० वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे व विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते, हे आराध्याने आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत तिने मिळवलेले यश हे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे.
मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान:
आराध्याच्या या यशामागे विद्यालयातील अनुभवी व अभ्यासू शिक्षकांचे सातत्यपूर्ण आणि योग्य मार्गदर्शन लाभले. यामध्ये मार्गदर्शक शिक्षक श्री. एस. एन. बदडे , सौ. एस. के. डोईफोडे, सौ. एस. यु. पाटील आणि श्रीम. डी. बी. धुमाळ यांनी तिच्याकडून वर्षभर पद्धतशीर तयारी करून घेतली होती.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव:
या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. एम. पानारी आणि पर्यवेक्षक श्री. आर. जी. इंगळे यांनी आराध्याचे पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले व तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि गुरसाळे ग्रामस्थांकडून आराध्या जाधव व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांवर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.





Social Plugin