Ticker

6/recent/ticker-posts

शिस्त, स्वच्छता अन् संगणक ज्ञान; पळसवाडी जिल्हा परिषद शाळेचा अनोखा आदर्श!



पळसवाडी प्रतिनिधी, अभिषेक ठेंगडे 

पळसवाडी: "सुंदर माझी शाळा" या म्हणीचा प्रत्यय आणून देत, ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावाने आज संपूर्ण राज्यासमोर शिक्षणाचा एक नवा आदर्श ठेवला आहे. पळसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने खाजगी शाळांनाही लाजवेल अशी प्रगती केली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्याचा विडा उचलला आहे.

बंद पडलेल्या सुविधांना मिळाली नवी संजीवनी

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक हेमकांत सुतार यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये या शाळेचा पदभार स्वीकारला त्यांनी पदभार हाती घेतल्यानंतर शाळेचे रूपडेच बदलून गेले. केंद्र सरकारच्या प्रकल्पातून शाळेला संगणक लॅब (Computer Lab) मंजूर झाली होती, मात्र तिथे इंटरनेटची सुविधा नसल्याने ती धूळ खात पडली होती. मुख्याध्यापक सुतार यांनी सहकाऱ्यांच्या आणि पालकांच्या मदतीने लोकसहभागातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी २४ तास इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली यामुळे मुलांमधील कुतूहल वाढले असून ते तंत्रज्ञानाचे धडे गिरवत आहेत.

याशिवाय, शाळेत असलेली 'ऑस्ट लॅब' आणि सुरक्षेसाठी बसवलेले १६ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बंद अवस्थेत होते मुख्याध्यापक सुतार यांनी स्वतःच्या खिशातून आणि सहकाऱ्यांच्या मदतीने हे सर्व कॅमेरे आणि लॅब पुन्हा सक्रिय करून घेतल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शिक्षण दोन्ही सुकर झाले आहे 

पहिलीपासून 'सेमी इंग्रजी'चे शिक्षण; पालकांचा वाढता कल

सध्या पालकांचा कल खाजगी इंग्रजी शाळांकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, ज्यामुळे गरीब पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून पळसवाडी शाळेने याच वर्षापासून पहिलीपासून 'सेमी इंग्रजी'चे (Semi-English) वर्ग सुरू केले आहेत यामुळे गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याला मोफत आणि दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळणे शक्य झाले आहे. या अभिनव उपक्रमामुळे यावर्षी पहिलीच्या वर्गात तब्बल २२ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे 

खाजगी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरासारख्या चांगल्या सुविधा मिळत नाहीत, हा गैरसमज पळसवाडी जिल्हा परिषद शाळेने दूर केला आहे शिस्त, स्वच्छता, आधुनिक कॉम्प्युटर लॅब आणि सुरक्षित वातावरण या बळावर ही शाळा आज एक उत्तम आणि जिवंत उदाहरण बनली आहे 

मुख्याध्यापकांचे अथक प्रयत्न, शिक्षकांची साथ आणि पालकांचा विश्वास यांच्या त्रिवेणी संगमामुळे पळसवाडी जिल्हा परिषद शाळा आज इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठरत आहे.