पळसवाडी प्रतिनिधी अभिषेक ठेंगडे
गल्ले बोरगाव: "मुलांना शिकण्यासाठी शाळा हवी, पण इथे तर छतातून पाणी टपकतंय!" अशीच काहीशी बिकट परिस्थिती सध्या गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची झाली आहे . सततच्या पावसामुळे वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुरक्षित जागाच उरलेली नाही
वर्गखोल्यांमध्ये साचले पाणी; भिंतीही पोखरल्या
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे शाळेच्या इमारतीच्या स्लॅबमधून पाणी टपकत असून, वर्गखोल्यांमध्ये पाण्याचे डबके साचले आहे . छतातून पाणी गळत असल्यामुळे वर्गखोल्यांच्या भिंती पूर्णपणे साजरल्या (पोखरल्या) आहेत वर्गात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना बसायचे कुठे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ वर्गखोल्याच नव्हे, तर शाळेच्या मुख्य मैदानातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे तसेच, शाळेतील स्वच्छतागृहांची (टॉयलेट) अवस्थाही अत्यंत दयनीय झाली असून, तिथे पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही
लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची प्रशासनाला विनंती
या परिस्थितीवर बोलताना शाळेच्या शिक्षकांनी सांगितले की, "पावसामुळे वर्गखोल्या गळत असून मुलांसाठी शैक्षणिक वातावरण खराब झाले आहे नुकतीच नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झाली असून, आम्ही शासनाकडे लवकरात लवकर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवणार आहोत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे
सुधारणा न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनियुक्त अध्यक्षांनी या दुरवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. "शासनाने जिल्हा परिषद शाळांच्या या बिकट अवस्थेकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले पाहिजे स्थानिक नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनीही यात लक्ष घालणे गरजेचे आहे" असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला की, "विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो जर प्रशासनाने या शाळेचे काम तात्काळ मार्गी लावले नाही, तर मी विद्यार्थ्यांसाठी माझ्या जीवाची बाजी लावून आमरण उपोषणाला बसेन
या बिकट परिस्थितीमुळे गल्ले बोरगाव येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून, प्रशासन आता तरी जागे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin