सोनपेठ , (प्रतिनिधी): शिवशंकर तुपकर
पाथरी तालुक्यातील गुंज येथील शिवाश्रमाचे प्रमुख तथा प्रख्यात अध्यात्मिक मार्गदर्शक पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे शुक्रवारी (दि. १७) सकाळी छत्रपती संभाजीनगरजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुःखद घटनेमुळे पाथरी तालुक्यासह मराठवाडा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील त्यांच्या हजारो शिष्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पू. कालिदास महाराज बोरीकर हे गुजरातमधील एका धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहराजवळील निपाणी फाट्यानजीक त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात महाराजांचे धाकटे बंधू हणमंतराव बोरीकर यांच्या पत्नी स्मिता हणमंतराव बोरीकर (रा. सातारा) यांचाही मृत्यू झाला. तसेच महाराजांच्या दुसऱ्या लहान भाव





Social Plugin