प्रतिनिथी : सोनपेठ ( शिवशंकर तुपकर)
सोनपेठ तालुक्यामध्ये आरोग्य विभागामध्ये अनेक वर्षे काम करणारे डॉक्टर सिद्धेश्वर हालगे हे अत्यंत चांगले सेवा करून लोकांच्या सर्व परिचित आहेत. डॉक्टर शेटे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक कामे शिकले डॉक्टर प्रेमाकर शेटे साहेब देवदूत म्हणून ओळखले जात अनेक वर्षापासून दवाखाना हा गावामध्ये होता. त्या ठिकाणी ॲम्बुलन्स जात नव्हती अनेक स्त्रियांना त्या ठिकाणी बाहेरगावी पाठवताना अडचण निर्माण होत होती. अनेक यंत्रसामुग्रीची कमतरता भासत होती. त्या काळामध्ये ग्रामीण रुग्णालयाची गरज ओळखून फौजिया खान आरोग्य मंत्री असताना डॉक्टर सिद्धेश्वर हालगे यांनी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून ग्रामीण रुग्णालयासाठी जागा निश्चित करण्यात आली. व काही दिवसातच ग्रामीण रुग्णालय याची नारळ फौजिया खान यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. इमारत पूर्ण होऊन कम्प्लीट झाली.
परंतु ही इमारत सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मनुष्यबळ उपलब्ध नव्हते कोवीच्या कालखंडामध्ये या या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले. पी एस सी या ठिकाणी आणण्यात आली व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाची वाटचाल सुरू झाली. या कोविड काळात काम करणारी कर्मचारी अभिमानाने सांगतात की या इमारतीमध्ये रात्री झोपणारा पहिला कर्मचारी हालगे सर हे आहेत. अनेक डॉक्टर या ठिकाणी सेंटर मध्ये कार्यरत होते. जगेल की मरण या काळामध्ये देखील या कर्मचाऱ्यांनी आपली बाजू व आपली जबाबदारी ओळखून काम केले आज त्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही पद्धतीने प्रशासन मान देत नाही. उलट त्यांची बदली केली व त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सोनपेठ च्या तमाम जनतेला ग्रामीण रुग्णालय निर्माण करणारे ग्रामीण रुग्णालय सुरू करणारे कोण आहेत हे माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे भाग्यविधाते म्हणून त्यांचं नाव सर्वीकडे जाईल हे लक्षात ठेवा





Social Plugin