महाराष्ट्र ग्रामीण न्युज | जव्हार प्रतिनिधी : विजय अधिकार
जव्हार : जव्हार पोलीस ठाण्यात नुकतेच बदलीने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. किरण पवार यांचा पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी इमरान कोतवाल (पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पालघर जिल्हा), साजिद मेमन तसेच महाराष्ट्र ग्रामीण न्युजचे प्रतिनिधी विजय अधिकार यांनी पोलीस निरीक्षक किरण पवार यांची सदिच्छा भेट घेत त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यात अधिक समन्वय राहावा, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच जनतेला त्वरित व न्याय्य सेवा देण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
कार्यक्रमानंतर उपस्थितांनी श्री. किरण पवार यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी सेवेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.





Social Plugin