Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम हात्ता अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त ! अनेक वर्षाचे अतिक्रमण काही तासातच गायब !




प्रतिनिधी अनिकेत चांदणे 

बाळापूर ताप्र :-तालुक्यातील नवलैकिक असेलेली ग्राम पंचायत हाता येथे गेल्या अनेक वर्षापासून आठवडी बाजार तसेच मुख्य रस्त्यावर विघ्न संतोषी लोकांनी अतिक्रमानाचा विळखा निर्माण केला होता त्या अतिक्रमणामुळे आठवडे बाजारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.

  निर्माण  झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे आठवडी बाजार येथे बाजाराच्या दिवशी खाद्यपदार्थावर घाणेवरती डास मासी तसेच मच्छर बसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरण माकडे ग्रामपंचायतने गांभीर्याने लक्ष देत वारंवार अतिक्रमण धारकांना लेखी स्वरूपात नोटीस देऊन सुद्धा अतिक्रमणधारक ग्रामपंचायतच्या कागदाला केराची टोपली देत होते परंतु प्रकरण हाता ग्रामपंचायत पुरते मर्यादित न राहता पंचायत समितीकडे प्रकरण केले गेल्या आठवड्यात दैनिक अजिंक्य भारत मे बातमी प्रकाशित करतात बाळापुर पंचायत समिती गटविकास अधिकारी नाना पजई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गंगाधर गुंडेकर विस्तार अधिकारी पस बाळापुर यांनी पोलीस प्रशासनाला लेखी तक्रार करून गावातील अतिक्रमणधारकांना सांगून सुद्धा अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढले नाही.

 त्यामुळे हाता ग्रामपंचायत प्रशासक सरपंच वैशाली कुचके तसेच ग्रामविकास अधिकारी मनीषा देशमुख यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून अखेर दि २७ जुलै रोजी पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटविण्यात आले.