पुसेगाव दि [प्रतिनिधी ]
राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा ठिकाणी तालुकास्तरीय प्लास्टिक निर्मूलन, घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पना मंजुरी मिळाली आहे. यातूनच खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे कचरा डेपो नाही तर नव्याने उभा राहत असलेला कचरा प्रक्रिया उद्योग प्रकल्प केवळ पुसेगावसाठी नसून परिसरातील सर्वच गावांसाठी आहे.
यामुळे परिसरातील एकाही गावाला वाड्या वस्त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. त्यामुळे पुसेगावसह पंचक्रोशीत नागरिकांनी आपल्या सर्वांच्या आरोग्याची विशेष दक्षता म्हणून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला केवळ विरोधाला म्हणून विरोध न करता सामंजस्याने सहकार्य करण्याचे आवाहन श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन डॉ सुरेश जाधव यांनी केले.
पुस्थान ट्रस्टच्या स्वतः च्या जागेत सध्या सुरू आहे. या प्रकल्पाची तातडीने उभारणी करण्यासाठी पुसेगाव येथील श्री सेगाव ता खटाव येथे सुमारे ८८ लाख रुपये खर्चाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी श्री सेवागिरी देवसेवागिरी मंदिरात ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत डॉ सुरेश जाधव बोलत होते. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष (बाळासाहेब) जाधव, प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामविकास अधिकारी नागरगोजे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन जाधव तसेच विविध पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
रणधीर जाधव म्हणाले, हा कचरा डेपो नसून कचरा निर्मूलन प्रकल्प आहे. सुमारे ३३x ६० जागेत बंदिस्त असलेल्या शेड मध्ये सुका कचरा व प्लास्टिक पदार्थांचे निर्मूलन करण्यात येणार आहे. याप्रक्रियेत कोणत्याही प्रकारची घाण आजुबाजूला पडणार नाही, धूर किंवा दूषित पाण्याची निर्मिती ही होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी भविष्यातील मोठी गरज म्हणून या प्रकल्पाच्या उभारणीस सहकार्य करावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खटाव तालुक्यात पुसेगाव साठी हा प्रकल्प मंजूर झाला, मात्र ग्रामपंचायतीला जागा उपलब्ध होत नसल्याने मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज यांच्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने स्व मालकीची जागा या प्रकल्पासाठी दिली आहे. दुर्दैवाने हा प्रकल्प उभारण्यात अडचण आणल्यास जिल्ह्यातील इतर ठिकाणी हा निधी जाऊन तिकडे प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे.
यावेळी प्रकाश जाधव, गणेश जाधव, राम जाधव, गिरीष कुलकर्णी, प्रवीण जाधव, अरुण जाधव, धीरज जाधव, कोळी यांनी सूचना मांडत आपली मनोगते व्यक्त केली.
ग्रामपंचायतीकडून मदत
या प्रकल्पात न जाणारा ओला कचरा हा संकलित करून गावातील तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कंपोस्ट अथवा गांडुळ खताच्या निर्मिती साठी देण्यात येणार आहेत, तसेच त्यांना याबाबत शासकीय अनुदानमिळावे म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे.विशाल मोहनराव जाधव प्रभारी सरपंच, पुसेगाव.
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सुका कचरा व प्लास्टिक पदार्थांचे विलीगीकरण कुटुंब स्तरावर करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून गावातील प्रत्येक कुटुंबाला असा कचरा साठवण्यासाठी एक बॅग ही देण्यात आली आहे. बाजारपेठेतील सर्व हॉटेल आणि इतर व्यावसायिकांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्या साठलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत सूचना करून प्रसंगी कडक निर्बंध लावणार आहे.--मा.ए जे नागरगोजे, ग्रामपंचायत अधिकारी, पुसेगाव
.





Social Plugin