रांजणगांवदेवी (प्रतिनिधी )
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या देवगांव ता नेवासा येथील वारकऱ्यांच्या दिंडीची सेवा बेल्हेकर ग्रुप ऑफ इंस्टीट्यूस कृषी महाविद्यालय,भानसहीवरे येथील कृषी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार तसेच आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली.
महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या व गावकऱ्यांच्या व कृषी सहाय्यक (कांचन गरड मॅडम)यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची विचारपूस करत सेवाभावाचे दर्शन घडविले. दीर्घ पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत आशीर्वाद दिले.
समाजसेवेची भावना जोपासण्याबरोबरच वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या सेवाकार्यात महाविद्यालयातील कृषी दूत पंकज बर्डे ओंकार भाकरे ऋषीकेश भांगे प्रणोत नवले युवराज रजपूत अदी विदयार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना अल्पोपहार पिण्याये पाणी तसेच आवश्यक ती मदत उपलब्द करू दिली विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी व वारकऱ्यांनी कौतुक केले





Social Plugin