प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर प्रतिनिधी)
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनसेवा सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हा परिषद अमळनेर–पातोंडा गटातील सावखेडा, दापोरी, पातोंडा, नांद्री आणि खोशी या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन शाखांचे उद्घाटन तसेच विविध विकासकामांचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच गावागावांतील विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधून विविध विकासकामांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालत जनतेची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण भागातील विकास, जनसंपर्क आणि संघटन बळकटीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





Social Plugin