Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक स्व हुकूमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर दे मही येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी


प्रतिनिधी @ समाधान भुतेकर 

स्थानिक स्व हुकूमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर दे मही येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली..वारकऱ्यांच्या वेशात आलेले विद्यार्थी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले..विठ्ठल रुखमाई च्या वेशभूषेत आलेले बाळ गोपाळ कार्यक्रमाची शोभा वाढवून गेले..जय हरी विठ्ठलाच्या नामघोषात शिस्तीत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते..हा अत्यंत सुंदर व नेत्रदीपक सोहळा जय हरी विठ्ठलाच्या नामघोषात दुमदुमला ..सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर तर प्रमुख अतिथी म्हणून श्री देशमाने सर शाखा व्यवस्थापक बुलडाणा अर्बन शाखा दे मही ,आणि पर्यवेक्षक श्री खेडेकर सर हे होते...मान्यवरांच्या हस्ते सामूहिक आरती घेण्यात आली तर भुतेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल भक्तीवर आधारित सुंदर असे नृत्य विद्यार्थ्यांनीनी सादर केले..

सदर कार्यक्रमध्ये विद्यार्थ्यांनी पाऊली ,फुगडी असे विविध कौशल्य सादर करून उपस्थित तांची मने जिंकली..या कार्यक्रमासाठी श्री खेडेकर सर,चव्हाण सर ,शिवशंकर शिंगणे सर,मेजर अशोक चेके सर,गुमलाडू सर,सुनील आंधळे सर,राम पालवे सर,हरीश शिंगणे सर बनसोडे सर सह सर्व शिक्षक व शिक्षतेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले..तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशव तळेकर सर यांनी केले..