Ticker

6/recent/ticker-posts

बुध जिल्हा परिषद शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत चौकार.


  बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

 महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील बुध ता . खटाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे . शाळेचे मृण्मयी पंकज पवार ( २६२ ) , गायत्री नितीन घनवट ( २५८ ) , प्रणव अनिल सुर्यवंशी ( २५४ ) , अन्विता सुरेंद्र दळवी ( २४६ ) हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत . गायित्री नितीन घनवट या विद्यार्थिनीने दुहेरी यश मिळवित नवोदय विद्यालयात देखील प्रवेश मिळविला आहे . सर्वाधिक गुणवत्ताधारक व सर्वाधिक निकाल कायम राखत शाळेचे ३५ पैकी २६ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत . शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभर  काटेकोर नियोजन करुन विदयार्थ्यांची सातत्यपूर्ण तयारी येथील शिक्षक करून  घेतात .      या यशस्वी विदयार्थ्यांना वर्गशिक्षक नितीन घनवट , दिपाली घनवट , मुख्याधिपीका माधुरी नलवडे , जितेंद्र जगताप , दत्तात्रय जाधव , दमयंती अब्दागिरे , उमा रणसिंग  आदींचे सहकार्य लाभले . यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे मुख्यमंत्री कार्यालययाचे उपसचिव वैभव राजेघाटगे , आयएएस दिलीप जगदाळे , गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते , विस्तार अधिकारी संगिता गायकवाड , केंद्र प्रमुख अजित निकाळजे , सरपंच सौ . सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , माजी प्राचार्य के .डी. पवार , शेखर घाटगे , नितीन खोत , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सुतार , उपाध्यक्ष श्रध्दा पवार , दयानंद जगदाळे , अंजुम मोमीन व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थांनी अभिनंदन केले .