बुध , दि. ४ (प्रकाश राजेघाटगे) -
मुंबईकर, पुणेकर, इतर नोकरवर्ग, व्यावसायिक व राजापूरच्या लेकी यांच्या देणगीतून उद्यम हेल्प सेंटरच्या माध्यमातून राजापुरातील गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद शाळा राजापूर यांना इंटरनेटसाठी रु. ७,५००/- ची देणगी दिली व गरीब आणि निराधार मुलांना मोफत वह्या व शालेय वस्तू देणगीदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास बळीराम डंगारे, डॉ. अशोक गार्डे, दीपक घनवट, संतोष लवंगारे, बापूराव घनवट, रणजित दळवी, सोमनाथ खवळे, दत्तात्रय तारळकर, बळीराम सुर्यवंशी, जगदाळे गुरुजी, डॉ प्रथमेश दळवी, देणगीदार व शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते.दीपक घनवट यांनी देणगीदार यांचे आभार मानले.





Social Plugin