बुध दि [ प्रकाश राजेघाटगे  ] 

श्री. सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुसेगाव संचलित डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला हुशार व प्रगतीशील विद्यार्थी विघ्नहर्ता इस्टेटचे संस्थापक संचालक गजानन चव्हाण यांचे चिरंजीव स्वराज गजानन चव्हाण याने कराटे क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. स्वराजने कराटेमध्ये अत्यंत मानाचा व कठीण समजला जाणारा 'सेकंड ब्लॅक बेल्ट'(Second Black Belt) यशस्वीरीत्या प्राप्त केला असून, या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल आणि पुसेगाव परिसराच्या वैभवात मोलाची भर पडली आहे. शाळेमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात स्वराजचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वराज चव्हाण याने मिळवलेल्या या यशाबद्दल खालील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत:

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुसेगाव संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव , उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव , सचिव मोहनराव जाधव, खजिनदार लक्ष्मणराव जाधव  आणि सर्व संस्था संचालक.

शालेय प्रशासन गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी के;डी . पवार ,डी .पी. शिदे , डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलचे  मुख्याध्यापीका धनश्री पोतदार ,आणि पर्यवेक्षक सागर ठोंबरे .

शिक्षक व पालक वर्ग शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक आणि पुसेगावचे ग्रामस्थ यांनी आभिनंदन केले .

स्वराजने अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.