Ticker

6/recent/ticker-posts

जेष्ठ पत्रकार, साहित्यिक देवचंद महाले यांचा दरीमाता प्रतिष्ठानकडून यथोचित सन्मान,



प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर इगतपुरी, 

मान्यताप्राप्त व कृतिशील असलेल्या 'पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र'च्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल दैनिक लोकसत्ता व दैनिक प्रहारचे जेष्ठ पत्रकार, ग्रामीण साहित्यिक, कवी, लेखक तथा पर्यावरण संवर्धक देवचंद महाले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दरीमाता पर्यावरण, पर्यटन प्रतिष्ठानच्या वतीने आज रविवार, १२ जून रोजी त्यांना शाल व टोपी देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.

या सत्काराचे औचित्य साधत देवचंदभाऊ महाले यांच्या हस्ते दऱ्याई माता पर्यावरण क्षेत्रात दोन पिंपळाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. केवळ पदाचा सत्कार स्वीकारून न थांबता प्रत्यक्ष वृक्षारोपण करून त्यांनी आपल्या पर्यावरण संवर्धनाच्या व्रताचा पुनरुच्चार केला.

याप्रसंगी नाशिक जिल्हा वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. कृष्णा महाराज धोंडगे, नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक, पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष, जेष्ठ पत्रकार तथा शाश्वत व प्राचीन जलसंवर्धन अभ्यासक राम खुर्दळ, दऱ्याई माता पर्यावरण व पर्यटन प्रतिष्ठानचे वृक्षमित्र भारत पिंगळे, तसेच वृक्ष व वनौषधी अभ्यासक शिवाजी भाऊ धोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. महाले यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.