Ticker

6/recent/ticker-posts

राधाकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी स्वराज चव्हाण याची आंतरराष्ट्रीय हॅन्ड टू हॅन्ड फायटिंग स्पर्धेसाठी निवड!



 उझबेकिस्तान येथे खेळणार आंतरराष्ट्रीय सामना

बुध   दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

पुण्यातील खराडी येथे १८ ते २१ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय 'हॅन्ड टू हॅन्ड फायटिंग स्पोर्ट्स ट्रेनिंग' शिबिरामध्ये पुसेगाव पंचक्रोशीतील सुपुत्र चिरंजीव स्वराज चव्हाण याने आपल्या उत्कृष्ट आणि कौशल्याने नटलेल्या खेळाच्या जोरावर उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय हॅन्ड टू हॅन्ड फायटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.विघ्नहर्ता रिअल इस्टेटचे संस्थापक संचालक श्री. गजानन चव्हाण यांचा मुलगा असलेल्या स्वराजने लहान वयातच क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण पुसेगाव पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

खराडी (पुणे) येथील या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी देशभरातून तब्बल २०० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अत्यंत कडक शिस्त आणि आव्हानात्मक प्रशिक्षणादरम्यान स्वराजने आपल्या खेळातील चुणूक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.स्वराजच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक  अजित पाटील सरआणि शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी स्वराजकडून घेतलेल्या कठोर परिश्रमामुळेच त्याला हे यश संपादन करता आले. या यशाबद्दल दोन्ही प्रशिक्षकांचे क्रीडा जगतातून आणि सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

"स्वराज हा अत्यंत मेहनती आणि गुणवंत विद्यार्थी आहे. त्याने मिळवलेले हे यश संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद असून, तो आमच्या राधाकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलचा खरा हिरा आहे."

मुख्याध्यापिका धनश्री पोतदार व सागर ठोंबरे सर स्वराजच्या या आंतरराष्ट्रीय निवडीबद्दल ॲडव्होकेट विशाल जाधव यांच्यासह पुसेगाव पंचक्रोशीतील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले असून, उझबेकिस्तान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.