Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूरात मृत वानरावर अंत्यसंस्कार



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील शेतकरी बसवंत विश्वनाथ बिद्राळे यांच्या शेतात कुञ्याने चावा घेतल्यामुळे एका वानराचा मृत्यु झाला.त्या मृत वानर प्राण्यावर शेतातच बुधवार दि.२२ जुलै रोजी आदमपूर येथील वन्यजीव प्रेमी तरुणांकडून शोकाकुल अंत्यविधी करण्यात आला.

येथील बसवंत बिद्राळे यांच्या शेतात सकाळी ९:३० वाजता एक वानर मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.गावातील सर्पमित्र तथा वन्यजीव प्रेमी राज मुंडकर यांना माहिती मिळाल्यानंतर काही तरूण सोबतीला घेऊन त्या वानरावर हिंदू रितीरिवाजानुसार एका कडुलिंबाच्या झाडाखाली खोल खड्डा करून मृत वानरास मातीआड करण्यात आले.यावेळी राजेश मुंडकर,वन्यजीव प्रेमी  तथा  पञकार जाफर आदमपूरकर, ओंकार शिराळे, शंकर कासलवार,सदव बोमडूले, ओमकार बिद्राळे, शिवानंद इंगळे आदि तरूण उपस्थित होते.