Ticker

6/recent/ticker-posts

अमान चा वाढदिवस गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देत साजरा....



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील रहिवासी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यालयीन सहाय्यक तथा महाराष्ट्र ग्रामीण न्यूज पञकार महमदरफी फक्रूशा मदार यांचे सुपूत्र चि.अमान मदार चा आठवा वाढदिवस शुक्रवार दि.२४ जुलै रोजी सायंकाळी परिसरातील गरजू लहान मुलांना वही,पेन,चाॅकलेट शैक्षणिक साहित्य वाटप करीत साजरा करण्यात आला.सकाळी जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेतही सर्वच मुलांना चाॅकलेट भेट देत शिक्षक मंडळींसह वाढदिवस अभीष्टचिंतन करण्यात आले.

सदरील कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक फक्रूशा पिरसाब मदार,सौ.बिस्मिल्लाबी मदार,कवी, गीतकार,पञकार जाफर आदमपूरकर,सना आदमपूरकर, संजय नागेश्वर, महमदरफी मदार,रेशमा मदार, सद्दाम शेख,अयान आदमपूरकर, अदिबा आदमपूरकर, आमेरा मदार,सोहम अनपलवार,  अनन्या नागेश्वर,शुभम नागेश्वर,रियान शेख, विराज 

नाईक, अनुश्री नागेश्वर, श्रेयस नागेश्वर, सुफियान शेख, गोविंद नाईक, मन्मथ इंगळे, महेबुब शेख,महेक शेख, विकास इंगळे,माहीन शेख, मुख्तार शेख,दस्तगीर शेख आदि बच्चे मंडळी,कुटुंबीय सदस्य तथा लहान मुलांची भरगच्च उपस्थिती होती.