Ticker

6/recent/ticker-posts

चाळीसगावात मोफत कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण जनजागृती



प्रतिनिधी 

दीपक गुरव@ चाळीसगाव

चाळीसगाव-रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी मोफत कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. हा उपक्रम वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळा, वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज, पिंपरखेड तांडा येथे सोमवारी आयोजित करण्यात आला. होता.

या अभियानामध्ये मुलींना एचपीव्ही विषाणूमुळे होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह घसा, गुदमार्ग व इतर कर्करोगांपासून संरक्षणासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. (दुसरा डोस) लसीकरणाबाबत जनजागृती करून विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन सहभाग घेतला.