Ticker

6/recent/ticker-posts

भाजपची खुलताबाद मंडळात जिल्हा-तालुका बैठक; विविध संघटनात्मक कार्यक्रमांचे नियोजन



खुलताबाद : प्रतिनिधी अभिषेक ठेंगडे 

भारतीय जनता पक्षाच्या खुलताबाद मंडळात जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी (दि. ६) शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. बैठकीच्या प्रारंभी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या आगामी विविध संघटनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण शिबिराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय SIR संदर्भातील माहिती व मार्गदर्शनही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले.

बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष संजयभाऊ खंबायते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा सरचिटणीस विकास कापसे, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर नलावडे, अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनेशभाऊ अंभोरे, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजिम मनियार, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, शहराध्यक्ष परसराम बारगळ, तालुका सरचिटणीस शिवाजी गायकवाड, प्रशांत गदानकर, अरुण पाटील यांच्यासह नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, BLA-2 तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.