Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते हारदे कुटुंबीयांना ३३ कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण



खुलताबाद : प्रतिनिधी अभिषेक ठेंगडे 

खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील हारदे कुटुंबीयांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले ३३ कुणबी प्रमाणपत्रांचे प्रकरण अखेर मार्गी लागले. सोमवारी (दि. ६) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते संबंधित लाभार्थींना कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी हारदे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत मनोज जरांगे-पाटील यांचे आभार मानले. मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांनी सुमारे दोन तास वेळ देऊन कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून आत्मीयतेने मार्गदर्शन केले. त्यांच्या या सहकार्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाल्याची भावना हारदे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

याप्रसंगी हारदे कुटुंबीयांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या समाजकार्यातील योगदानाचे कौतुक करत, त्यांनी दिलेला सन्मान, वेळ व सहकार्य आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी निरोगी व दीर्घायुषी राहून समाजसेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवावे, अशा सदिच्छाही व्यक्त करण्यात आल्या.

या कार्यक्रमास संतराम हारदे, विठ्ठल हारदे, भाऊसाहेब हारदे, रामहरी हारदे, शिवाजी हारदे, संतोष हारदे, दिनेश हारदे, प्रदीप हारदे, अनिल हारदे, किरण हारदे, बाळू हारदे, आप्पासाहेब हारदे यांच्यासह हारदे कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.