Ticker

6/recent/ticker-posts

इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या दिंडीला ना. एकनाथ शिंदे यांची भेट




बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा - पंढरपूर मार्गावर पायी वारी करत असलेल्या इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या पायी दिंडीच्या म्हसवड (ता. माण) येथील मुक्कामस्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट देत वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी इंचगिरी रसाळ संप्रदायाचे मठाधिपती पांडुरंग रसाळ, शिवसेना नेते विश्वंभर बाबर यांच्यासह संप्रदायाचे भक्त, पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व वारकऱ्यांना पालखी सोहळ्याच्या शुभेच्छा देताना, पांडुरंगाच्या कृपेने राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि समाधान लाभो. बळीराजा समृद्ध होवो आणि सर्वांच्या जीवनात आनंद नांदो, अशी प्रार्थना व्यक्त केली. तसेच वारकरी संप्रदायाच्या विविध प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून ते सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी इंचगिरी संप्रदायाच्यावतीने मठाधिपती पांडुरंगम्हसवडच्या इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या दिंडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. रसाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यानंतर म्हसवड येथील सनगर समाजाच्यावतीने संदीप गोंजारी, अमित गोंजारी, शंकर पानसांडे, मदन गोंजारी, नितीन गुजर आणि सचिन आहेत गुजर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा वैभव गणेश मंडळाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. या प्रसंगी वारकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.