प्रतिनिधी : विशाल गंडाळ येवला
नगरसूल ...... बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास दुधाने भरलेला टँकर नांदगाव कडून येवल्याकडे जात होता. परंतु राज्य मार्ग क्रमांक 25 वरील नगरसूल लगत असलेल्या मुळबाई घाटात पहाटेपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे ब्रेक न लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुधाचा टँकर हा घाटामध्ये उलटला .टँकर उलटल्यामुळे संपूर्ण शेतात दूध वाहून गेले. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून चालक देखील जखमी झाला आहे. व उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आले आहे..........





Social Plugin