Ticker

6/recent/ticker-posts

सुरवाणीच्या युवा प्रगतिशील शेतकऱ्याचा कृषी विभागाकडून प्रदान



*सातपुडा भगर उत्पादक कंपनीचे संचालक दिलीप पाडवी यांच्या कार्याचा गौरव*

(*ग्रामीण,प्रतिनिधी देवचंद  पाडवी* ) :

 महाराष्ट्र शासन कृषी विभाग व नंदुरबार जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने धडगांव तालुक्यातील सुरवाणी येथील युवा प्रगतिशील शेतकरी तथा सातपुडा भगर उत्पादक कंपनीचे संचालक दिलीप नरेश पाडवी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, भगर पिकाच्या उत्पादन व प्रसारासाठी केलेले योगदान, तसेच शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

दिलीप पाडवी यांनी सातपुडा भगर उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भगर उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, दर्जेदार उत्पादनास प्रोत्साहन देणे आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा प्रसार करणे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून शेतीकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा मिळाली आहे.

या सन्मानाबद्दल कृषी विभागातील अधिकारी, विविध मान्यवर तसेच शेतकरी बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले. सुरवाणी गावासाठी हा सन्मान अभिमानास्पद मानला जात असून, भविष्यातही शेती विकासासाठी असेच कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार दिलीप पाडवी यांनी व्यक्त केला.